महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये १० ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये १० ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : नुकतेच आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार ओडीशा, आंध्र प्रदेशात उत्तर किनारपट्टीचा प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांमध्ये ९ ने ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात पूर्व मध्येला कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, यामुळे ओडीशा, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये ९ ते ११ जून दरम्यान तर महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये १० ते ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटक, रायलसीमापर्यंत पोहोचला आहे. बहुतांश तामिळनाडूचा भागही मान्सूनच्या पावसाने व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मान्सून मध्य अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक आणि कोकणाचा भाग लवकरच व्यापून टाकेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com