बोरगड : निरंकारी संत समागमातील सेवेकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

बोरगड : निरंकारी संत समागमातील सेवेकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

नाशिक । म्हसरूळ नजिक असलेल्या बोरगड येथे निरंकारी सत्संग मैदानावर सेवेकरी म्हणून काम करणार्‍या 55 वर्षीय सेवेकर्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

सुरेश गणपत राजगिरे (55, रा. निलकंट रो हाऊस, दौलतनगर, नाशिक) असे सेवेकर्‍याचे नाव आहे. राजगिरे हे बोरगड येथे निरंकारी सत्संग मैदानावर सेवेकरी म्हणून काम करीत होते. गुरुवारी (दि.23) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते चक्कर येऊन खाली पडले.

त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com