हर्षवर्धन सदगीर नाशिक महापालिकेचा ब्रँड अँबेसिडर
स्थानिक बातम्या

हर्षवर्धन सदगीर नाशिक महापालिकेचा ब्रँड अँबेसिडर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी दैदिप्यमान कामगिरी करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविल्यानंतर आता महापालिकेचा ब्रँड अँबेसिडर होणार आहे.

दरम्यान शनिवारी (दि. १८) रोजी महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकतेच महाराष्ट्र केसरी ठरलेल्या हर्षवर्धनचा नाशिक महापालिकेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हर्षवर्धन यास नाशिक महापालिकेचा ब्रँड अँबेसिडर करावा याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांनी एक मताने ठरावास मंजुरी देत हर्षवर्धन सदगीर महापालिकेचा ब्रँड अँबेसिडर म्हणून ठरवण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com