पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील २२ लाखाचा गुटखा जप्त
स्थानिक बातम्या

पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील २२ लाखाचा गुटखा जप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर पहाटेच्या सुमारास आयशर मधून २२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांच्या अधिक माहितीनुसार इंदोरहून नवी मुंबईकडे जाणारा आयशर क्रमांक MP १३ GB १४३३ या गाडीतुन अवैधरित्या वाहतूक करीत असलेला २२ लाख २० हजाराचा जप्त केला असुन या प्रकरणी आयशर चालक नारायण राजाराम चव्हाण व जिवण रमेश चव्हाण दोघेही राहणार इंदोर यांच्यावर वर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यवाहीत पो.नि.कांतीलाल पाटील, संजय पाटील सह पो.ह. सुशांत मरकट, मंगेश गोसावी, सचिन पिंगळ, संदीप लगड आदि सहभागी होते

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com