ग्रामसेवकांना मिळणार २५ लाखांचे विमा संरक्षण; संगणक परिचालकांचाही समावेश

ग्रामसेवकांना मिळणार २५ लाखांचे विमा संरक्षण; संगणक परिचालकांचाही समावेश

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा कर्मचारी, ग्रामपंचायत सेवक यांच्या पाठोपाठ आता राज्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतील संगणक परिचालक यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील २ हजार २८८ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व संगणक परिचालकांना होणार आहे.

केंद्र सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य सेवकांचा ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर कर्मचारीही कार्यरत असल्याने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत सेवक यांना ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करून त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयित रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत सेवक , ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्व जण अहोरात्र काम करीत आहेत. जोखीम पत्करून काम करणारे ग्रामीण भागातील हे सर्व सेवक म्हणजे करोनाविरुद्धच्या लढय़ातील सैनिकच आहेत. त्यामुळे ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी व संगणक परिचारक आदीचा आता
९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा उतरावा,असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

अतिरिक्त मानधन लवकरच!
३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमित वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाऱ्यांना सेवकांना दिले जाणार आहे असे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संगणक परिचारक यांच्या विमा काढण्यात संदर्भातले परिपत्रक प्राप्त झाले आहे त्यानुसार ९२२ ग्रामसेवक १९८ ग्राम विकास अधिकारी व ११६८ संगणक परिचारकांच्या विमा काढला जाणार आहे
-रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद

अतिरिक्त मानधन लवकरच!
३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमित वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे,असे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com