Friday, April 26, 2024
Homeनाशिकबाहेरून येणाऱ्यांना गावात प्रवेशबंदी; ग्रामीण भागात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

बाहेरून येणाऱ्यांना गावात प्रवेशबंदी; ग्रामीण भागात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

हतगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही यास प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांना याबाबत माहिती देण्यात आली असून कोणीही बाहेर जाऊ नये अथवा गावात येऊ न देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील २१ दिवस भारत बंदची घोषणा केली आहे. जिल्हाभरात सीमाबांदी करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यात खबरदारी घेण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ आदी दुर्गम भागातील अनेक गावात कोरोना पासून गावाच्या बचावासाठी ग्रामस्थांनी व मजुरांनी बाहेरगावी जाऊ नये तसेच बाहेर गावातील नागरिक व मजुरांनी गावात प्रवेश करू नये, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच गावात वेळच्या वेळी फवारणी केली जात आहे.

- Advertisement -

अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून मुख्य रस्त्यावर ग्रामस्थांनी झाडांच्या फांद्या किंवा दगड गोटे ठेवले आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्ती ना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गर्दी होईल असा कुठलाही प्रकार करू नये. नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा ग्रामस्थांनी गावातल्या गावात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शासनाला एक अति दुर्गम भागातील अनेक गावातील नागरिकांनकडून लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या