Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपार्सल सुविधेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; हॉटेल व्यावसायिकांमध्ये चैतन्य

पार्सल सुविधेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; हॉटेल व्यावसायिकांमध्ये चैतन्य

नाशिक | कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉक डाऊन सुरू आहे. या मुळे बाहेरगावचे विद्यार्थ्यां, कामगार, श्रमिक यांच्या जेवणाची मोठी गैरसोय होत आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अशा विद्यार्थ्यांना शहरातील हॉटेल्स मधून पार्सलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेला उत्तम प्रतिसाद मिळत असून हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने नाशिकमधील का विद्यार्थी तथा कामगार, नागरिक यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही सुविधा चालू केली. झोमॅटोच्या माध्यमातून तसेच पोलीस आयुक्तांच्या एका आदेशानुसार सुरु झाली आहे. त्यानुसार संचारबंदी काळात झोमॅटो ऍप द्वारे घरबसल्या जेवण ‘ऑर्डर’ करता येत आहे. या निर्णयामुळे बाहेरगावचे विद्यार्थी, कामगार तसेच शहरात कोरोनाच्या संचारबंदीमूळे अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. संचारबंदीमुळे व्यवसायात तोटा सहन करत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांमध्येही चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

- Advertisement -

विद्यार्थी, इतर प्रांतातून आलेले श्रमिक आणि बॅचलर्स यांचा ऑनलाईन जेवण मागावणा-यामध्ये अधिक प्रमाण आहे, लोकांनी ऑनलाइन मागणी करावी त्यामुळे आपण कोरोनाला रोखण्यापासून रोखू शकतो, या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. संसर्ग रोखण्यासाठी ग्राहकांनी आपले जेवण ऑनलाईनच मागवावे, उद्यापासून ऑनलाइन ऑर्डर्सला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा आहे
-ज्योत्स्ना देसाई, संचालक, श्री चिंतामणी रेस्तराँ

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाइन पार्सल सुविधा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरणार आहे. ही सुविधा संचारबंदी काळात विद्यार्थी, कामावते बॅचलर, दूर गावावरून आलेल्या लोकांना खूप उपयुक्त ठरत आहे.
-जय मदन, संचालक, तंदूर वर्ल्ड एक्सप्रेस.

- Advertisment -

ताज्या बातम्या