गाेदावरीने घेतला मोकळा श्वास; प्रदूषणात माेठी घट

गाेदावरीने घेतला मोकळा श्वास; प्रदूषणात माेठी घट

नाशिक | वर्षानुवर्ष प्रदूषणाच्या विळख्यात सापडणारी गाेदावरी नदी सध्या कराेनाच्या ‘लाॅकडाऊन’ मुळे खूष झाली आहे. नदीतील प्रदूषणात माेठी घट झाली असून कारखाने व माेठे उद्याेग बंद असल्याने गाेदावरी माेकळा श्वास घेत आहे. नदीतील पाण्याचा बीआेडीदेखिल सुधारला आहे.

गाेदावरी नदीतील प्रदूषण हा नाशिककरांसाठी कळीचा व तितकाच भावनांशी निगडीत आहे. शहराच्या विविध भागांतून नदीत मिसळणारे सांडपाणी, एसटीपीचे मलजल व माेठ्या उद्याेगांचे रासायनिक घटक मिसळते. त्यामुळे गाेदावरी नदी एव्हाना पूर्णत: प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असते. मात्र आता कराेनामुळे सर्वच बंद आहे. त्यात प्रामुख्याने तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. आता उद्याेगांमधील प्रदूषण थांबले आहे.

त्यामुळे गाेदावरी नदी खूष असल्याचे मत पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी व्यक्त केले. तर, सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात बसून आहेत. त्यामुळे नदीत घनकचरा फेकण्याचे प्रमाण घटलेे आहे. तसेच पूजाविधी कमी झाल्याने प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.

सध्या गाेदावरी नदीला शासकिय अतिक्रमणाचा म्हणजेच काँक्रिटीरणाचा जास्त त्रास असून प्रक्रिया केलेले मलजल अर्थात एसटीपीेचे प्रदूषण तसेच आहे. दरम्यान, नदीत केमिकलच मिसळत नसल्याने ती माेकळा श्वास घेत आहे.

गाेदावरी नदीत राेज पाहायला मिळणारे प्रदूषण माेठ्या प्रमाणात घटले आहे. कोराेनामुळे का हाेईनाा नदी माेकळा श्वास घेत असून पाण्याचा बीआेडी सुधारत आहे.
-राजेश पंडित, पर्यावरणप्रेमी, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com