शेवगे दारणा येथे बिबट्याने पाडला शेळीचा फडशा
स्थानिक बातम्या

शेवगे दारणा येथे बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : शेवगे दारणा परिसरात सायंकाळी सहा वाजेचह सुमारास शेळीचा बिबट्याने फडशा पाडला.

दरम्यान शेवगे दारणा येथील तुकाराम भवानी कासार यांच्या शेतालगत सुदाम माळी हे आपल्या शेळ्या चारत असताना बिबट्याने हल्ला केला. यात एका शेळीचा फडशा पाडत आरडाओरडा झाल्याने बिबट्याने धूम ठोकली.

याबाबत पोलीस पाटील उज्वला कासार व उपसरपंच राजाराम कासार यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे गोसावी व पढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या वास्तव्याने परीसरात घबराट निर्माण झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com