रेडक्रॉस सिग्नलवर स्विफ्टने चिरडल्याने तरुणी ठार
स्थानिक बातम्या

रेडक्रॉस सिग्नलवर स्विफ्टने चिरडल्याने तरुणी ठार

Gokul Pawar

नाशिक । शहरातील रेडक्रॉस सिग्नल येथे भरधाव स्विफ्ट कारने चिरडल्याने 21 वर्षीय तरुणी ठार झाली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. व्टिंकल जगदीश नागरे (21, रा. गोळे कॉलनी, नाशिक) असे तरुणीचे नाव आहे.

व्टिंकल ही गुरुवारी (दि.16) सायंकाळी पाचच्या सुमारास रेडक्रॉस सिग्नलजवळून जात असतांना तिला एमएच 17 एजे 7684 क्रमांकाच्या स्विफ़्ट कारने चिरडले. कारची जोरदार धडक बसल्याने तिला गंभीर इजा झाली.

त्यामुळे व्टिंकलला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यूू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com