मनमाड : मोटार चालू करतांना शॉक लागून मुलीचा मृत्यू

मनमाड : मोटार चालू करतांना शॉक लागून मुलीचा मृत्यू

मनमाड : पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करतांना विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनमाड जवळील कुंदलगाव येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास हि घटना घडली. गायत्री ज्ञानेश्वर कडनोर असे या मुलीचे नाव असून ती इयता नववीत शिकत होती.

अधिक माहिती अशी कि, मनमाड पासून ९ किमी अंतरावर कुंदलगाव असून सकाळी गायत्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी मोटार सुरू करत असताना तिला विजेचा जबर धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कुंदलगावात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com