Saturday, April 27, 2024
Homeनाशिकघोटी लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत; रोजगाराचा प्रश्नही गंभीर

घोटी लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत; रोजगाराचा प्रश्नही गंभीर

घोटी : करोना विषाणूचा घोटीत शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल आठ दिवस घोटी बंद राहिल्याने घोटीत जनजीवन विस्कळीत झाले मेडिकल वगळता जीवनावश्यक वस्तूंबरोबरच भाजीपाला दूध आदींची दुकाने बंद राहिल्याने ग्रामस्थाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तसेच खते व बियाणांची दुकानेही बंद राहिल्याने बळीराजाही हवालदील झाल्याचे चित्र दिसत होते.

नाशिक जिल्ह्याची घोटी ही प्रमुख बाजारपेठ असल्याने तालुक्यातच नव्हे तर तालुक्याबाहेरही या घोटी लॉकडाऊनची झळ अनेकांना सोसावी लागली. तर ग्रामीण भागातीलही बहुतांश जनजीवन घोटी बाजारपेठेवर अवलंबून आहे. गेल्या आठ दिवसापासून मेडिकल वगळता जीवनावश्यक किराणा, भाजीपाला, दुध आदींची दुकानेही बंद राहिली त्यामुळे सर्वसामान्य व मजूर वर्गाला याची झळ सोसावी लागली.

- Advertisement -

याबरोबरच घोटी ही मोठी बाजारपेठ असल्याने घोटीच्या व्यवसाय व व्यापारावर अनेकांना रोजगार व मजुरी मिळत असते त्यामुळे आठ दिवसापासून हाताला काम नाही अन मजुरीची नसल्याने या मजूर व कामगार वर्गाच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मे महिना संपल्याने शेतकरी वर्गाने आता आपले लक्ष खरिपाच्या हंगामाकडे, शेतीकडे केंद्रित केले आहे त्यामुळे बी बीयाने खते, व शेतीची साधने खरेदी करण्यासाठी शेतकरी घोटीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

मात्र खतांची व बियाणांची दुकानेही लॉकडाऊन असल्याने शेतकरीही वर्गही हतबल ठरत आहे दोन दिवसांपूर्वी खते व बियाणांची दुकाने काही अंशी उघडण्यास प्रशासणाने संमती दिली होती मात्र घोटीत कोणतेही वाहन व नागरिकांना प्रवेश दिला जात नसल्याने बियाणांची दुकानेही बंद राहिली त्यामुळे बहुतांश शेतकरी हतबल होऊन रिकामेहाती परतत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या