जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करायची आहे? इथे क्लिक करून मिळवा पासेस
स्थानिक बातम्या

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करायची आहे? इथे क्लिक करून मिळवा पासेस

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक पोलिसांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच शेती माल वाहतूकदार यांच्यासाठी विशेष सूचना देण्यात आली असून सर्व कृषी पूरक व शेती माल द्राक्ष, भाजीपाला, कांदा किंवा इतर कुठलाही शेती माल वाहतूक करणे कामी आरटीओ नाशिक यांचे द्वारा शेती माल वाहतूक गाड्यांसाठी ऑनलाइन पासेस देण्याचे कामसुरू झाले असून सदर सर्व कागदपत्रांची सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास एक दिवसात परवाना दिला जात आहे.

दरम्यान नाशिक आरटीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी असून यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.  गाडीचे सर्व कागदपत्रे, आर.सी.बुक, इन्शुरन्स कॉपी, ड्रायव्हर लायसन, क्लिनर लायसन तसेच ड्रायव्हरचे व क्लिनरचे ओळखपत्र लागणार आहे यासोबतच सदर गाडीचा पास हा किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत ( किती दिवस मुदत) पाहिजे ते कळविणे गरजेचे आहे.

यासाठी करावयाचा असून आरटीओच्या mh15@mahatranscom.in या ईमेल वर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे पाठविल्यानंतर ते अर्ज पाठविणाराच्या मेल वरती पासेस उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे.

तसेच सर्व शेती माल वाहतूकदार ऑनलाइन अर्ज हा शक्य असेल त्या ठिकाणाहून पाठवू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाशिक आरटीओ ऑफिस येथे जाऊन सदर डॉक्यूमेंट्स ची पूर्तता करावी व पासेस घ्यावे. यासाठी सकाळी १० ते ६ या वेळेत आरटीओच्या ०२५३२२२९००५ दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओ मार्फत करण्यात आले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com