Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रघरगुती गॅस सिलेंडर ५२ रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या सविस्तर

घरगुती गॅस सिलेंडर ५२ रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या सविस्तर

नाशिक : देशभरातील गृहिणींना दिलासा मिळाला असून घरगुती गॅस सिलिंडर ५२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामन्यांच्या खिशाला बसणारी झळ कमी होणार आहे.

दरम्यान काशीद दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य धक्का बसला होता. परंतु आज तब्बल ५२ रुपयांनी गॅस दर कमी झाल्याने ग्राहक वर्ग सुखावला आहे. बिगर सबसिडी असलेला स्वयंपाकाच गॅस सिलिंडर (१४. २ किलोग्रॅम) ५२.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे ८९३. ५० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर मार्च महिन्यात ८४१ रुपयांना मिळणार आहे. आजपासून घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती बदलल्याने सिलिंडरच्या किमतीत घसरण झाली आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाने दिलासा दिला आहे. दर कमी झाल्याने व्यावसायिकांना केवळ १४६५.५० रुपयांत सिलिंडर मिळणार आहे. तसेच ५ किलोग्रॅमचा छोटा सिलिंडरदेखील १८. ५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

त्यामुळे हा सिलिंडर ग्राहकांना केवळ ३०८ रुपयांत मिळणार आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सरकार सबसिडी देते. त्यामुळे ग्राहकांना हा सिलिंडर ५१५ रुपयांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या