नवीन नाशिक : ग्रुपमधून काढून टाकल्याने मित्राचा मित्रावर हल्ला

नवीन नाशिक : ग्रुपमधून काढून टाकल्याने मित्राचा मित्रावर हल्ला

नाशिक। दारू पिऊन व्यवस्थित वागत नसल्याने मित्रांच्या ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग मनात धरून मद्याच्या नशेत एकाने आपल्या मित्रावरच हल्ला केल्याची घटना मुंबईनाका भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित आरोपी पंकज कदम याचे विरुद्ध गुन्हा दाखल करीत कारवाई केली आहे.

संतोष रवींद्र गायकवाड (रा. साईबाबानगर, सिडको) असे फिर्यादी यांचे नाव आहे. याप्रकरणी गायकवाड यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पंकज कदम रा. सिंहस्थनगर (नवीन नाशिक) यांचे विरुध्द भा.दं.वि. कलम 324 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सोनार करीत आहे.

यातील फिर्यादी गायकवाड व संशयित कदम हे एकमेकांचे मित्र असून संशयित आरोपी मित्र मंडळीसोबत दारू पिल्यानंतर चांगला वागत नसल्याने त्यास मित्रांच्या ग्रुपमधून बाहेर काढले होते. याचा राग येऊन संशयित कदम याने रविवारी (दि. 5) रात्री साडेअकरा वाजता मुंबईनाका भागातील सुरूची हॉटेल भागात असताना मद्याच्या नशेत येऊन फिर्यादीस गाठले.

याठिकाणी त्याने फिर्यादीला गाठून शिवीगाळ करीत त्यास सिमेंटचा गट्टू फेकून मारल्याने गायकवाड जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात कदम विरुद्ध मारहाण व दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com