चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला
स्थानिक बातम्या

चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचा कुजलेला मृतदेह शनिवारी (दि.21) सायंकाळी चामरलेणी डोंगरावर आढळून आला आहे.

मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हास पुंडलिक सोनवणे (रा. बोरगड) हे त्या परिसरात गेले असता त्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी म्हसरुळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार चामरलेणीच्या झाडा झुडपात अंदाजे 25 ते 30 वयोगटातील युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com