हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
स्थानिक बातम्या

हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Gokul Pawar

Gokul Pawar

अहमदनगर (प्रतिनिधी)-  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्य आदर्शगाव समितीचे कार्यकारी अध्यक्ष व हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी ग्रामविकास, जलव्यवस्थापन, वृक्षलागवड आदी क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आदर्श गाव हिवरेबाजार हे राज्यासह देशात प्रसिध्द आहे. या गावामध्ये विविध उपाययोजना दुष्काळात राबविल्या आहेत.

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्काराची घोषणा केली जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. पोपटराव पवार यांच्यासह ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पोपटराव पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झालं आहे. १९८९ साली हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर गावातील जल संसधार, मृद संधारण आणि वनसंधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला. आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून या राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी पाणी फाऊंडेशन मध्ये देखील सहभाग घेतला. पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com