पेठ : अज्ञात वाहनाच्या धडकेत वनसेवक ठार
स्थानिक बातम्या

पेठ : अज्ञात वाहनाच्या धडकेत वनसेवक ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ । सावरणा येथील वन कर्मचारी मोहन शंकर राऊत (30) यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राऊत हे काल रात्री 9 वाजे दरम्यान पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल नातेवाईकास जेवनाचा डबा घेऊन येत होते.

पेठ तहसील कार्यालयासमोर रात्री 9 वाजे दरम्यान त्यांचा मोटरसायकलला (एमएच 15 एफ जी 5742) अज्ञात वाहनाने धडक दिली. राऊत यांना जखमी अवस्थेत पेठ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com