त्र्यंबकेश्वर : आदिवासींच्या वन जमिनिवर वनविभागाची गदा; झोपडया उठवण्याचे आदेश
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : आदिवासींच्या वन जमिनिवर वनविभागाची गदा; झोपडया उठवण्याचे आदेश

Gokul Pawar

Gokul Pawar

वेळुंजे वि.प्र. : त्र्यंबक जवळील पिंपळद शिवारातील आदिवासी कुटुंब कसत असलेल्या वन जमिनीवर वनविभागाने खड्डे खोदत ताबा मिळवत असल्याचा आरोप येथील कुटुंबांनी केला आहे.

दरम्यान पिंपळद(त्र्यंबकेश्वर)येथील गज विहीर या ठिकाणी राहणारे आदिवासी कुटुंबे या प्रकारामुळे चिंतेत आहेत. गेल्या काही वर्षापासून वन जमीन कसणाऱ्या कुटुंबाच्या ताब्यातील जमीनवर वन विभागाने ताबा घेतला असून यामुळे ही कुटुंबे उघड्यावर येण्याची शक्यता आहे. वनखात्याने या जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदले असून यामुळे सदरील कुटुंबे उघड्यावर येण्याची वेळ निर्माण झाली आहे.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते आपल्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी भात, नागली, वरई, खुरासनी इत्यादी पिके घेत असतात. शेतीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण कुटूंबाचे पालन पोषण याद्वारे करतात. काही वर्षांपूर्वी हजारो रुपये खर्चून त्यांनी जमीन विकसित केली. या जमिनीवर मेहनत घेत शेती उत्पादन काढण्यावर या कुटुंबांनी भर दिला होता. परंतु आता वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता ‘या जमीनीतून घरे हटवा असे सांगण्यात येत आहे. तसेच येथील जमिनीवर खड्डे खोदून वृक्ष लागवड करणारा असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

आधीच लॉक डाऊन असल्याने हाताला काम नाही, पैसा नाही, त्यातच वनविभागाने इथून जाण्याचे सांगितले असल्याने आधी उपासमार त्यात आता वनजमीनही हातातून जाते की काय? अशी भीती या कुटुंबांनी वाटू लागली आहे.

आम्ही यापूर्वीच अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक वनहक्क मान्य करणे, नियम २००८ व अधिनियम २००९ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत या कुटूंबाने वनहक्क दावे दाखल केले असून सन १९७७-७८ ते सण १९९१ पर्यंत वन विभागास शेत सारा भरल्याचे पुरावे आहेत. अजून त्या दाव्याचा निकाल बाकी असून ते आम्हास मिळेल अशी खात्री आहे.
– बंडू पोटींदे, भूमिहीन शेतकरी

शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारचे नुकसान केलेले नसून हे नवीन अतिक्रमण आहे. त्या ठिकाणी आम्ही खड्डे खोदून फळझाडे लावणार आहोत. या झाडांची जोपासना सदर शेतकऱ्यांनी करावयाची आहे.
– सुजित बोकड, वनपाल, अंजनेरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com