Friday, April 26, 2024
HomeनाशिकPhotoGallery : अंबड पोलिसांच्या संचलन प्रसंगी नागरिकांकडून फुलांचा वर्षांव

PhotoGallery : अंबड पोलिसांच्या संचलन प्रसंगी नागरिकांकडून फुलांचा वर्षांव

नवीन नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या संचलनाप्रसंगी अनेक चौका चौकांमध्ये पोलिसांचे स्वागत करून नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.

सध्या संपूर्ण देशात लाँकडाऊन असून सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी कायम तत्पर आहे, अशा अनेक उद्देशांनी आज अंबड पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचलन केले.

- Advertisement -

डीजीपी नगर माऊली लॉन्स येथून सुरू झालेलं हे संचलन खुटवड नगर, त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर, महाकाली चौक, दत्त चौक, घुगे मळा,राणा प्रताप चौक, पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आले होते.

या संचलनात सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी ,सुभाष पवार ,श्रीपाद परोपकारी, निलेश माईनकर, सिताराम कोल्हे, कमलाकर जाधव, सपोनी गणेश शिंदे, संजय बेडवाल उपनिरीक्षक राजकुमार तडवी, अन्सार शेख ,राकेश शेवाळे ,मिथुन म्हात्रे पोलीस हवालदार शांताराम शेळके, संजय जाधव, विजय शिंपी, प्रशांत नागरे, कैलास निंबेकर आदी शेकडो पोलिस सेवक व पोलीस मित्र सहभागी झाले होते.

या संचलनात नागरिकांनी पोलिसांवर अक्षरश: पुष्पवृष्टी करून पोलिसांविषयी आदर व्यक्त करुन आभार मानले.

साेशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

नागरिकांकडून संचारबंदी पाळावी म्हणूण हे असे संचलन केले जात आहे. परंतु संचारबंदी असताना नागरिक रस्त्यावर येत आहेत असेल त्यामुळे संचारबंदी कुठे सा प्रश्न उपस्थित हाेताे. लॉक डाऊन च्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असताना आशा पद्धतीने संचलन करणे योग्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.

पाेलीसांच्या कामाबद्दल आदर आहेच, पण हे असे चित्र पाहिले संचार बंदीचा फज्जा उडालेला दिसतो. पाेलीसी संचलनामुळे नागरिक गर्दी करीत आहे. वास्तविक सर्वत्र बंद असतांना पाेलीसांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी इतक्या माेठ्या प्रमाणात लाेकांना फुले मिळताय कुठून? रांगाेळी काढली जाते. याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या