त्र्यंबकेश्वर : मजुरांची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले; आंबोली चेक पोस्टवर पोलिसांची कारवाई

त्र्यंबकेश्वर : मजुरांची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले; आंबोली चेक पोस्टवर पोलिसांची कारवाई

त्र्यंबकेश्वर : बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नालासोपाराहुन येणाऱ्या पाच ट्रक यात तीस ते चाळीस मजूर बेकायदा घेऊन जातांना पोलीसांनी पकडले. त्र्यंबक जवळील आंबोली चेकपोस्ट ही त्र्यंबक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान त्या मजुरांची चौकशी करुन पुन्हा माघारी पाठविण्यात आले आहे. आंबोली येथील चेकपोस्टवर सकाळच्या सुमारास पाच ट्रक अडविण्यात आले. यावेळी प्रत्येक ट्रक मध्ये ३० ते ४० मजूर निदर्शनास आले. ही वाहने नालासोपारा मुंबई येथून यूपी ला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी तहसीलदार गिरासे, पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेंढे, आंबोलीतील आरोग्य टीमने भेट देत
परिस्थिती समजून घेतली असता वरील वाहन धारकाकडे कोणतही परवानगी घेतली नसल्याचे समजले.

या वाहनातील काही प्रवाशांकडे खाजगी डॉक्टरांचा वैद्यकीय दाखला होता. तसेच वाहनांकडे परवाने नासल्याने या वाहनांना माघारी पाठविण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com