Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपेठ : तालुक्यातील ११०० गरजूंना थेट अमेरिकेहून पाच लाखांची मदत

पेठ : तालुक्यातील ११०० गरजूंना थेट अमेरिकेहून पाच लाखांची मदत

पेठ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलमजुरी साठी स्थलांतरित झालेल्या मजुरांसाठी थेट अमेरिकीहून पाच लाखांची मदत करण्यात आली आहे. लासलगाव येथील योगेश कासट व मित्रपरीवाराच्या वतीने ही मदत पोहचवली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पेठ तालुक्यातील मोलमजूरीसाठी स्थलांतरीत झालेल्या हजारो कुटूंबियांनी गावचा रस्ता धरला. मात्र अनेकांच्या हाताला काम नसल्याने एकवेळची चुल पेटविणेसुद्धा जिकरीचे झाले आहे.

- Advertisement -

अशातच सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनी सोशल मिडीयावर अशा गरजूंसाठी मदतीच्या केले. या आवाहनास लासलगावचे भूमिपुत्र अमेरिकेतून प्रतिसाद देत पाच लाख रूपयांची सढळ हाताने मदत केली.

योगेश कासट हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित लियल डायनामिक ह्या कंपनीत कामाला असून त्यांच्यासोबत हैद्राबादचे राहुल मेहता, संकेत शाह,सदीप शुक्ल,जेसन या सर्व सहका-यांनी केली. या आर्थिक मदतीतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील सुमारे ११०० कुटूंबीयांना पंधरा दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाटप करण्यात येत आहे.

या वाटप कामात स्थानिक सरपंच, जि.प.सदस्य, पोलिस पाटील आदी हातभार लावत असून अमेरिकेवरही कोरोनाचे गंभीर संकट असताना निफाड तालुक्यातील लासलगावच्या भूमिपुत्राने दाखविलेल्या दातृत्वाचे सर्वत्र कौतूक होत असून पेठ तालुक्यातून आभार व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या