लासलगाव येथे मालगाडीचे पाच डबे घसरले
स्थानिक बातम्या

लासलगाव येथे मालगाडीचे पाच डबे घसरले

Gokul Pawar

Gokul Pawar

लासलगाव : लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ बी टी सायडिंग या ठिकाणी रेल्वेची खळी वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे पाच डबे घसरले असल्याची घटना घडली. परंतु त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याने त्याचा प्रवाशांना फारसा फटका बसला नाही. काल रविवार सकाळी आठ वाजेच्या सुमारास बी टी सायडिंग या ठिकाणी मालगाडीचे पाच डबे घसरले होते

मालगाडीचे डबे घसरल्याचे समजल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुळावरून घसरलेले मालगाडीचे डबे क्रेन आणि पोकलंड च्या साहाय्याने उचलून सुरळीत रेल्वे रुळावर ठेवले. या वेळी कार्यकारी अभियंता रावसाहेब,सेक्शन इंजिनिअर सोनवणे, स्टेशन प्रबंधक सुरवाडे, रेल्वेचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर डी के जगताप, परिवहन निरीक्षक मनोज पिल्ले, सिनिअर सेक्शन इंजिनीअर राहुल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मालगाडीचे घसरलेले डबे रेल्वे रुळावर सुरळीत ठेवले

लासलगाव रेल्वे स्थानकाच्या बी टी सायडिंग या ठिकाणी रेल्वेची खडी वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे पाच डबे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावरुन घसरले. मात्र रेल्वेचे मुख्य दोन्ही वाहतूक लाईन सुरळीत सुरू असून रेल्वे सेवेवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. रविवारी दुपारी एक वाजे पर्यंत घसरलेले पाच डबे पूर्ववत करण्यात आले

-समाधान सुरवाडे, स्टेशन प्रबंधक लासलगाव

Deshdoot
www.deshdoot.com