आता तुम्हीही होणार व्यायामाचे ब्रँड अँम्बेसिडर; डाॅ रविंद्र सिंगल यांचा फेसबुक पेजवरून फिटनेस फंडा

आता तुम्हीही होणार व्यायामाचे ब्रँड अँम्बेसिडर; डाॅ रविंद्र सिंगल यांचा फेसबुक पेजवरून फिटनेस फंडा

नाशिक : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शरीराकाळजी घेणं महत्वाचे आहे. त्यासोबत तंदुरूस्ती अर्थात फिटनेस ही काळाची गरज आहे. यासाठी व्यायाम हा आपली जीवनशैली असली पाहिजे. म्हणून डॉ. रवींद्र सिंघल यांनी फेसबुकच्या माध्यमातून “Ambassadors of Fitness” उपक्रम सुरू करीत आहेत.

दरम्यान नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उदयास येत आहे. या उपक्रमात सहभागी होणारा प्रत्येकजण झेपेल असा व्यायाम करणार, त्यासोबत व्यायामाचे व्हिडीओज्, फोटोज् किंवा माहिती या पेजवर शेयर करून इतरांना प्रोत्साहित करण्याचे कामही या माध्यमातून होणार आहे.

सध्या देशातील प्रत्येक जण कोरोना सारख्या एका जागतिक पातळीवरच्या संकटाला सामोरे जात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता, निर्जंतुकीकरण , सोशल डिस्टंसिंग आणि उत्तम प्रतिकारशक्ती या गोष्टींची गरज आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करत घरीच थांबणार आहोत.

त्यामुळे नागरिकांनी घरी राहून आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी व्यायाम देखील करणे गरजेचे आहे. आता जिम्स बंद आहेत, घराबाहेर देखील पडायचे नाहीये. तेव्हा पुशअप्स, पुलअप्स, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन यासारख्या शरिराला आणि मनाला तंदुरूस्त राखणाऱ्या व्यायामाची जीवनशैली अंगीकारण्यासाठी हा फेसबुक ग्रुप तयार केला आहे.

या पेजवर सर्व सदस्यांना फिटनेस क्षेत्रातील अनेक तज्ञ वेळोवेळी आॅनलाईन मार्गदर्शन देखील करणार आहेत.

तसेच या पेजच्या काही नियम व अटी असणार आहेत. या पेजवर व्यायाम, फिटनेस या विषयाव्यतिरिक्त कोणतीही माहिती अथवा वादग्रस्त मजकुर टाकायचा नाही. अर्थात हा नियमभंग करणाऱ्या व्यक्तीस हे ग्रुप सोडणे बंधनकारक असणार आहे.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोशल मिडिया हा कोणताही उदात्त आणि लोककल्याणकारी उद्देश सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आजच्या काळातील सर्वात प्रभावी पर्याय आहे. आणि याच माध्यमाचा उपयोग आपण एकमेकांमध्ये व्यायामाची आवड व सवय निर्माण करण्यासाठी करणार आहोत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com