
सिन्नर : करोना संसर्गाने बाधित झालेल्या दापूर येथे ९१ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने या रुग्णाला सिन्नर येथील कोविड रुग्णालयातून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील हा रुग्ण होता. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य उपचाराने बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.