द्वारका येथील गोदामाला आग लागल्याने चारा जळून खाक
स्थानिक बातम्या

द्वारका येथील गोदामाला आग लागल्याने चारा जळून खाक

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : द्वारका येथील जाणते स्वामिल येथील गोदामाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशोक जांदे यांच्या मालकीच्या या ठिकाणी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही लागली.

दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या ठिकाणी गाईंना खाण्यासाठी चारा ठेवण्यात आलेला होता. याद्वारे आग लागली असल्याचे समजते. स्थानिकांनी लागलीच घटनेची माहिती महापालिकेला कळवली.

घटनेची माहिती मिळाल्यांनतर महापालिकेकच्या अग्निशमन दलाचा एक बंब तसेच जवान व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. याकोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com