नवीन नाशिक : पवननगर येथील भाजी मार्केट शॉपिंग सेंटरला आग
स्थानिक बातम्या

नवीन नाशिक : पवननगर येथील भाजी मार्केट शॉपिंग सेंटरला आग

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : पवन नगर येथे काल जनरल स्टोअर्स पान दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिजामाता मार्केट नगर येथे राजेंद्र सुकलाल जाधव यांचे जनरल स्टोअर्स पान दुकान चे सामान विक्री असा व्यवसाय आहे. काल (दि.०४) रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जाधव यांच्या दुकानाला अचानक आग लागली.

या घटनेची माहिती अग्निशामक दलाला समजताच अग्निशामक दलाचे आर.ए. लाड, एस. डी. घुगे, एस. बी. गाडेकर, के.के. पवार, ए. एस. सोनवणे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या पथकाला ही आग नियंत्रणात आणण्यास सुमारे एक तासाचा वेळ लागला. आग लागल्याचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com