Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांंबाबत २० जूनला निर्णय जाहीर करणार : मंत्री उदय...

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांंबाबत २० जूनला निर्णय जाहीर करणार : मंत्री उदय सामंत

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यापीठांच्या पहिल्या आणि दुसर्‍या वर्षाच्या परीक्षा रद्द करून त्यांना थेट पुढच्या वर्षात ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या परीक्षा वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, २० जून पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाबद्दल निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

दरम्यान युजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार ०१ ते ३१ जुलै दरम्यान विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज्य सरकारने विद्यापीठांच्या पहिल्या, दुसर्‍या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे आदेश असले तरीही स्वायत्त संस्था परीक्षांचं नियोजन करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत.

सरकारच्या आदेशांचं पालन करणं स्वायत्त संस्थांना बंधनकारक असल्याने त्याच्या बोलून हा प्रश्न मिटवला जाईल असा दिलासा विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच ज्यांनी परीक्षा फी भरली त्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेऊन त्याबाबतचा दिलासा देणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या