निफाड : डोंगरगाव येथे तोंडाला मास्क न बांधल्याने एकावर गुन्हा दाखल

निफाड : डोंगरगाव येथे तोंडाला मास्क न बांधल्याने एकावर गुन्हा दाखल

विंचुर : निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील पांडुरंग दत्तू आव्हाड (वय २७ वर्षे ) याने तोंडाला मास्क न बांधता दुसऱ्याला त्रास होईल असे कृत्य केल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लासलगाव येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला.

दरम्यान सध्या सर्वत्र लॉक डाऊन असून नागरिकसाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या अधिसूचना काढल्या आहेत. अशातच या तरुणाने यासंदर्भातील कोणतीही काळजी न लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कोरोना पासून स्वतःची काळजी घेतली नाही व कोरोना चा प्रसार होईल असे हलगर्जीपणाचे कृत्य केले म्हणून त्याच्याविरुद्ध  लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड हे करत आहेत.कोणीही रिकामे घराबाहेर पडु नये. रिकामटेकडे फिरतांना कोणी असे आढळुन आले तर त्यांच्या कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड यांनी दिला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com