Monday, April 29, 2024
Homeनाशिकसिन्नर : वावी येथे गावात फिरणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : वावी येथे गावात फिरणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : कोरोना विषाणू व त्या संदर्भाने सुरू असलेल्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत कुठल्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता विनाकारण गावात फिरणाऱ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत शिवाजी जाधव (19) व रोहित चंद्रकांत आहेर (26) हे दोघे आज (दि.1) सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असणाऱ्या नाना नानी पार्क जवळ पोलिसांच्या गस्ती पथकाला आढळून आले. त्यांना संचारबंदी असताना बाहेर का फिरतात असे विचारले असता कोणतेही सबळ कारण सांगता आले नाही. या दोघांनीही तोंडाला कुठल्याही प्रकारचा मास्क अगर रुमाल बांधलेला नव्हता.

- Advertisement -

कोरोना विषाणूची साथ असताना स्वतःच्या आरोग्याबद्दल निष्काळजीपणा दाखवला. कोरोना रोगाचा संसर्ग होईल असे कृत्य केले व जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश उंबरकर यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

वावी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. वारंवार सांगूनही सुचनांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे ऍक्शन मोडवर येत पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा असे आवाहन सहाय्यक निरीक्षक गलांडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या