भद्रकाली : मागील भांडणाची कुरापत काढत दोन गटात हाणामारी
स्थानिक बातम्या

भद्रकाली : मागील भांडणाची कुरापत काढत दोन गटात हाणामारी

Gokul Pawar

नाशिक : जुन्या भांडणाच्या कुरापतीतून भद्रकालीत मंगळवारी रात्री दोन गटात तुंब्बळ हाणामारी झाली. यातून दोन्ही गटाकडून लाठ्याकाठ्यानी मारहाण करण्यासह चाकूने वार करण्यात आल्याने काहीजन गंभीर जखमी झाले. या प्रकरण भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अजय काटकर (नानावली, भद्रकाली) याने दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित विशाल सहाळे, यश सहाणे, गौरव पोटींदे, सोनु (रा. सर्व कोळीवाडा, नाशिक) यांनी काटकर व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. तसेच साहाळे याने काटकर याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. तर सहाणे याने चाकूने हल्ला केला. या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक मुळे करत आहेत.

तर गौरव पोटींदे यांच्या तक्रारीनुसार संशयित रोहित राठोड, आकाश परदेशी, नरेश शिंदे, राहुल ठाकरे, अजय काटकर (रा. सर्व नानावली) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून गौरव यांच्यावर चाकुने हल्ला केला. तर त्याचा मित्र विशाल सहाळे याच्या छातीवर चाकूने जखम केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार लभडे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com