पंचवटीत ५५ हजार रुपयांचा गुटखा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पंचवटीत ५५ हजार रुपयांचा गुटखा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पंचवटी : पंचवटीतील पेठरोड येथील एका गाळयात गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकत प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखू असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास पंचवटीतील पेठफाटा येथील मोती सुपर मार्केट बिल्डिंगच्या मागील बाजूस असलेल्या एका गाळ्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरणार, हवालदार महाले, काठे, मोंढे, मगर, देवरे, चव्हाण, पठाण आदींच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत दुपारच्या सुमारास मोती सुपर मार्केट बिल्डिंगच्या मागील बाजूस असलेल्या शीतळा देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या एका गाळ्यात छापा टाकला.

असता यात प्रतिबंधित असलेला रंगबाज पानमसाला, आरबीझेड चोइंग तंबाखू, वाह पान मसाला, हिरा, रॉयल ७१७ तंबाखू, महक सुपर पान मसाला, एमटू जर्दा, विमल आदी गुटख्याची सुमारे ५५ हजार रुपयांची ७२२ पाकिटे मिळून आली.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून या ठिकाणी असलेला संशयित अब्दुल्ला उर्फ दानिश महेमुद फारुकी( वय.३०रा. मोती सुपर मार्केट बिल्डिंग, रूम नं.६ , पेठरोड) यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com