रामनवमीदिनी घराघरांत उजळल्या ज्योती; कोरोना फायटर्सला प्रोत्साहन
स्थानिक बातम्या

रामनवमीदिनी घराघरांत उजळल्या ज्योती; कोरोना फायटर्सला प्रोत्साहन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा संपू्ण देशावर कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु अशाही परिस्थितीत शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता घराच्या बाल्कनीत, ओसरीत दिवे लावून रामनवमीचा आनंद घेतला.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा रामनवमी निमित्त ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम, राम जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आले आहेत. लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याकारणाने आता हा उत्साह साजरा करायचा कसा असा प्रश्न पडला होता. परंतु अभिनव उपक्रमाने यंदा रामनवमी साजरी करण्यात आली.

सायंकाळी सातच्या सुमारास अनेकांनी आपल्या घरसमोर, दाराबाहेर, तुळशी वृंदावनात, कंपाउंड वॉलवर ९ दिवे लावून अनोख्या पद्धतीने रामनवमी साजरी केली. कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या आपल्या भारताला सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी, आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छतादूत आणि पोलीस यंत्रणा या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी शहरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com