त्र्यंबकेश्वर : करोनाशी दोन हात करीत ग्रामीण भागात राब भाजणीस प्रारंभ
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : करोनाशी दोन हात करीत ग्रामीण भागात राब भाजणीस प्रारंभ

Gokul Pawar

Gokul Pawar

वेळुंजे | वि. प्र : सध्या सगळीकडे लॉक डाऊन असले तरी शेतकरी मात्र करोनावर मात करीत मशागत पूर्व काम करण्यात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

दरम्यान लॉक डाऊन चा दुसरा टप्पा थोड्यात दिवसांत संपुष्टात येईल. त्यानंतरचा निर्णय अद्याप प्रशासनाने दिलेला नाही. या काळात ग्रामीण भागातील जनतेवर या लॉक डाऊन चा परिणाम दिसून आला. उन्हाळ्यात सहसा मजुरीवर जाणारा नागरिक लॉक डाऊनमुळे घरी बसला. त्यातच शेतीची कामे सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला आहे.

लॉक डाऊन मुळे मशागत पूर्व कामांना सुरवात झाली आहे. यामध्ये नागली, भात, वरई पिकांसाठी आदर लावण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यात सध्या करोनाचे कोणतेही संकट नसले तरी आपल्यावर येऊ नये याची पुरेपूर दक्षता बाळगत शेतकरी वर्ग दिवसभर शेतातील कामासाठी वेळ देत आहे.

लॉक डाऊन चा परिणाम अधिकतर शहरी भागात जाणवत असून ग्रामीण भागात तरी या ‘लॉकडाऊन’चे सोयरसुतक कुणाला नसून, काही प्रमाणात अडीअडचणी येत असल्या तरी शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या मदतीने त्यावर मात करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतीसंबंधी कामानाही वेग असल्याने शेतमजुरांना कामे उपलब्ध झाली आहेत. शेतकरीही पूर्णवेळ शेतीत राबत आहे.

लॉकडाऊन शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असला तरी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे. तसेच किराणा, इतर जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण होत असल्याने उपासमारीची समस्या उद्भवू शकते.

– रामजी टोकरे, टोक पाडा

पर्यावरणपूरक राब भाजणी
आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. यासाठी गवत, सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असतो.

– देवचंद महाले

Deshdoot
www.deshdoot.com