शेतकऱ्यांचा शेतमाल सडतोय शेतातच; सावकाराला द्यायला पैसे द्यायचे कोठून?

शेतकऱ्यांचा शेतमाल सडतोय शेतातच; सावकाराला द्यायला पैसे द्यायचे कोठून?

नाशिक | विजय गिते :
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा,यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

देशभरात सर्वत्र करोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊनमध्ये लॉक झाले आहे. तसेच वाहतूकही पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

शेतातून काढलेला अन बांधावर टाकलेला कांदा संभाळायचा तरी किती ? दिवस याच चिंतेत कांदा उत्पादक आहेत.कारण सद्या निघणारा रब्बीचा कांदा जास्त दिवस टिकत नाही. अन तो एका जागेवर राहील्यास सडतो. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल का ? याबाबत शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.

शेतातून माल निघण्याचा कालावधी व करोना विषाणूमुळे झालेला लॉकडाऊन एकाच वेळी झाल्याने शेतीमालाचे नुकसान होत आहे.राज्यात शेतकरी व कांदा सूञ महत्त्वाचे समजले जाते.
शेतकरी कांदा करण्यासाठी सावकराकडून कर्ज घेतात. माल बाजारात विक्री केल्यानंतर मग सावकाराला पैसे देतात. परंतु, यावर्षी सावकाराला पैसे कोठून द्यायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

– भारत दिघोळे, अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com