सिन्नर : विंचूर दळवी येथे बिबट्याचा हल्ल्यात शेतकरी जखमी
स्थानिक बातम्या

सिन्नर : विंचूर दळवी येथे बिबट्याचा हल्ल्यात शेतकरी जखमी

Gokul Pawar

सिन्नर : तालुक्यातील विंचुरी दळवी परिसरामधील भावदेववाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात रामदास विष्णू दळवी हे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास घडली.

दरम्यान दळवी आपल्या शेतामध्ये गव्हाला पाणी देण्याचे काम करत होते. याचवेळी गव्हामध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक दळवी यांच्या वर जोरात हल्ला चढविला. या हल्ल्यात दळवी यांचा हात जबर जखमी झाला. जवळच असलेल्या दळवी यांच्या सहकाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी काठीच्या साहाय्याने बिबट्याचा प्रतिकार केला. यावेळी जखमी असलेल्या दळवी यांना उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भावदेववादडी परिसरामध्ये ४ ते ५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असल्यामुळे येथील परिसरामधील शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याच ठिकाणी बिबट्याच्या दहशतीमुळे भावदेववाडी परिसरामध्ये पिंजरा सुद्धा लावण्यात आला आहे. परंतु पिंजऱ्यामध्ये अजून बिबट्या जेरबंद झालेला नाही. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी परिसरामधून केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com