देवळाली कॅम्प : शेतकऱ्याने कोबी वर फिरवला रोटर; लॉकडाऊनमुळे पिके मातीमोल

देवळाली कॅम्प : शेतकऱ्याने कोबी वर फिरवला रोटर; लॉकडाऊनमुळे पिके मातीमोल

देवळाली कॅम्प : लोहशिंगवे येथील शेतकरी सुनिल जैन यांनी एक एकर कोबीवर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली.

दरम्यान सध्या देशभरात लॉक डाऊन असल्याने सर्वच ठप्प असून या काळात शेतमालाही शेतात पडून आहे. अशा परिस्थितीत शेकतऱ्यांच्या पिकावर कुऱ्हाड कोसळली आहे.

येथील शेतकऱ्यांने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या कोबीवर रोटा वेटर फिरवला आहे. शेतीवर गुजराण असलेल्या पिकांवर लागवड खर्च वाया गेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेतमाल वाया न घालवता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून शेतमाल विक्रीवर भर दयावा, जेणेकरून शहर व इतर खेड्यातील लोकांना याचा फायदा होईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com