मौजे पळसेला विष प्राशन करीत शेतकऱ्याची आत्महत्या
स्थानिक बातम्या

मौजे पळसेला विष प्राशन करीत शेतकऱ्याची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : मौजे पळसे येथे सोमवारी (दि.२५) शेतकर्‍याने विष प्राशान करुन आत्महत्या केली. देवीदास गायधानी असे शेतकर्‍याचे नाव आहे.

या प्रकरणी तहसिलदारांनी चौकशीचे आदेश दिले असून अहवाल मागवला आहे. दरम्यान चालू वर्षात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या ११ वर पोहचली आहे.

२०१९ च्या तुलनेत चालू वर्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जानेवारी ते मे या चार महिन्यात ११ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. नाशिक, कळवण, मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक व दिंडोरी, बागलाण, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यात प्रत्येकी दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.

करोना संकटासोबत शेतकरी आत्महत्या हा जिल्हा प्रशासनापुढे चिंतेचा विषय ठरत आहे. ११ पैकी एक शेतकरी आत्महत्या शासकिय मदतीस पात्र ठरले असून एक प्रकरण अपात्र ठरले आहे. उर्वरित नऊ प्रकरणे प्रलंबित आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com