नाशिकरोड : हातगाड्यावर भाजीसह मास्कची सर्रास विक्री
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : हातगाड्यावर भाजीसह मास्कची सर्रास विक्री

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड । का.प्र.

लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, किराणा व मेडिकल दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र हातगाड्यावर भाजीसह फॅन्सी मास्कची सर्रासपणे विक्री होत असल्याचे उपनगर परिसरात दिसून येते.

कोरोनापासून बचावाचे साधन म्हणून ज्या उपाययोजना आहेत त्यात तोंडाला लावण्याच्या मास्कचा प्रामुख्याने समावेश आहे. तथापि, सर्जिकल व तत्सम मास्कचा वापर योग्य असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी नमूद केलेले आहे.

फॅन्सी मास्कचा तर काहीही उपयोग नाही. मात्र घाबरलेल्या व धास्तावलेल्या नागरिकांच्या मनस्थितीचा गैरफायदा घेत काही महाभाग रहिवासी सोसायटी व कॉलनी परिसरात बिनधोकपणे हातगाड्यावर भाजीच्या नावाखाली फॅन्सी मास्कची विक्री करताना दिसतात.

ट्रॅक्टरवर औषध फवारणीचे व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रभाग 16 मध्ये असे प्रकार घडत असताना जागरूक व जनतेची काळजी वाहणारे लोकप्रतिनिधी या प्रकारापासून अनभिज्ञ कसे राहतात, असा सवाल उपस्थित होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com