PhotoGallery : कांदा घसरल्याने लासलगावसह येवला, देवळा परिसरात शेतकऱ्यांचे रास्ता रोकोसह आंदोलन

PhotoGallery : कांदा घसरल्याने लासलगावसह येवला, देवळा परिसरात शेतकऱ्यांचे रास्ता रोकोसह आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यतबंदी हटवण्याची ची केवळ घोषणा केली असून यासंदर्भातील अधिसूचना निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला किंमत मिळणार नाही या कडे लक्ष वेधत आज (दि.२) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पुढाकाराने आज जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी रोखून धरल्याचे चित्र होते.
केंद्र सरकारने देशांतर्गत घसरण होणाऱ्या कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी निर्यतबंदी हटवण्याची घोषणा केल्यावर विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या घोषणेनंतर कांदयाच्या भावात काहीशी वाढ देखील झाली होती. १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत असताना निर्यातबंदी हटवण्याची सरकारने अधिसूचना काढली नसल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा कमी दराने खरेदी सुरु केली. याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने कांदा उत्पादक संघटनेने सरकारच्या धोरणाचा निषेध करत आज जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्या बंद ठेवण्याची हाक दिली होती.
त्यानुसार सकाळपासूनच लासलगाव, विंचूर, देवळा, सटाणा, येवला, अंदरसूल, मुंगसे (मालेगाव) येथील बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे पदाधिकरी उपस्थित होते. कांदा विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाची माहिती देत कांडा निर्यातबंदी हटवण्याची केवळ घोषणा करण्यात आली असुन जोपर्यत सरकार अधिसूचना काढत नाही तोपर्यंत आपले नुकसान सुरूच राहिल ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी आपलीय वाहने घराच्या दिशेने माघारी वळवली.
यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांच्या समोर ठिय्या देतात सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध केला. कांदा उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणा देत अंदरसूल येते संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक – औरंगाबाद महामार्गावर कांदे ओतून सुमारे तासभर रास्तारोको केला. पिंपळगाव बाजार समितीत देखील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन लिलाव बंद पाडले होते.
अन्यथा राज्यभर आंदोलन 
आज दिवसभरात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवण्याबाबत अधिसूचना काढावी. कांदा निर्यात धोरण शेतकऱ्यांना अनुकूल असावे अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. लासलगाव येथे त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकारने निर्यातबंदी हटविण्याबाबत अधिसूचना न काढल्यास पुढील दोन दिवसात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन लिलावाची प्रक्रिया बंद पाडण्यात येईल असा इशारा दिघोळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरवात केली आहे. देवळा येथे संबंधित पोलीस अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधत असून येवलासह पिंपळगाव,अंदरसूल येथे आंदोलन सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com