सातपूरला आणखी सहा ‘हाय रिस्क’ रुग्णांची तपासणी; परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार
स्थानिक बातम्या

सातपूरला आणखी सहा ‘हाय रिस्क’ रुग्णांची तपासणी; परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार

Gokul Pawar

Gokul Pawar

सातपूर : बाधित महिलेच्या संपर्कातील हाय रिस्क असलेल्या संशयितांना पैकी एकाच दिवशी नऊ जण पॉझिटिव्ह आढळल्याने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने परिसरात तपासणी मोहीम राबवून या नऊ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचपणी करून सहा हाय रिस्क असलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या नाशिकरोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

सातपूर कॉलनी तील नऊ लोकांचा शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या पथकाची झोपच उडाली. सकाळी सातपूर कॉलनी परिसरात वैद्यकीय पथकाने बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी सुरू केली. यात सहा जण हाय रिस्क असल्याचे आढळन आले.

त्यामुळे त्यांना नाशिकरोड येथील महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच परिसरात बाह्यरुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अजूनही काही दिवस सुरूच राहणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सकाळी संपूर्ण परिसरात औषध फवारणीकरुन बाधित रुग्णांच्या निवासाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सातपूर कॉलनी येथील महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दोन मे रोजी प्राप्त झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने परिसरात मोहीम राबवून त्या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या वीस लोकांना क्वारंटाइन केले होते. त्यांचे अहवाल तपासणीसाठी तातडीने पाठवण्यात आले होते, मात्र दिवसानंतर कळविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढण्याची भीती वाढली आहे.

शासनाने प्रतिबंधित केलेल्या भागाची सर्व प्रवेशद्वार लाकडी दांड्याने बंद करण्यात आले आहेत. मात्र परिसर मोठा असल्याने नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातही खुलेआम फिरण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.

या परिसरात करोना पॉझिटिव्ह सापडले असले तरीही येथील नागरिकांमध्ये भीती दिसून येत नाही जणू आम्ही नाही त्यातले अशा भावनेने नागरिक वावरताना दिसून येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com