इगतपुरी : आजपासून महिंद्राच्या प्लांटमध्ये इंजिन निर्मिती सुरू

इगतपुरी : आजपासून महिंद्राच्या प्लांटमध्ये इंजिन निर्मिती सुरू

सातपूर : महिंद्रा अँड महिंद्रा यांचे इगतपुरी येथे इंजिन निर्मितीचा कारखान्यात सोमवारपासून उत्पादन प्रक्रिया सुरू होणार असल्याने कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे मेंटेनन्स साठी चाळीस लोक व व उत्पादनासाठी साठ लोकांची टीम सोमवारपासून कंपनीत दाखल होणार आहे.

महिंद्राच्या इगतपुरी कारखान्यात गेल्या महिन्याभरापासून ४० कर्मचारी व्हेंटिलेटर बनवायचे काम करीत होते. त्यांच्या माध्यमातून या कालावधीत ४० वेंटिलेटर तयार करण्यात आले असून ते टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत. यासोबत कंपनीचे मेंटेनन्स चे काम नाही जोमाने सुरू होते. उद्या सोमवार पासून कंपनीत खऱ्या अर्थाने उत्पादन प्रक्रिया सुरू होणार आहे.

महिंद्रा इगतपुरी प्लांटमध्ये उद्या ६० लोकांना जनरल शिप मध्ये कामावर बोलवण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून एम हॉक इंजिन ची निर्मिती करण्याचे काम सुरू होणार आहे. सुरळीत उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्यास ६० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवसाला ७२ एम हॉक इंजिन बनवले जाणार आहेत.

या इंजिनचा कांदिवली – चाकण – नाशिक व जहीराबाद या महिंद्रा च्या सर्व प्लांट मध्ये विशेष मागणी असते. यासोबतच एम हॉक इंजिन निर्यात देखील केले जात आहेत. त्यामुळे इगतपुरी प्लांटला खऱ्या अर्थाने कशी मिळणार असल्याचे चित्र आहे. साधारण पाचशे मनुष्यबळाची क्षमता असलेल्या या कारखान्यात पहिल्या टप्प्यात ६० लोकांपासून काम सुरू करण्यात येत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com