Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या ६१ विद्यार्थ्यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ‘ई-लर्निंग’

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या ६१ विद्यार्थ्यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ‘ई-लर्निंग’

नाशिक : लाँकडाऊन काळात सर्व शाळा, संस्था, क्लासेस बंद असताना मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या झूम अँपद्वारे ऑनलाइन शिक्षण घेता येत असल्याने पालक, शिक्षकांत समाधान आहे. या विद्यालयाच्या नववी व दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनच्या काळात घरबसल्या शिक्षण घेता येत आहे.

देशभरातील शाळा बंद असल्याने घरी बसून शिक्षकांना “वर्क फ्रॉम होम’ दिला आहे. टेक्नाॅलॉजीचा वापर करत झूम  अँप द्वारे ऑनलाइन शिकविण्याचा निर्णय संस्थेचे कार्याध्यक्ष आर. बी. शिरसाठ, सचिव विश्वास ठाकूर यांनी घेतला आहे.

- Advertisement -

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आर. बी. शिरसाठ, सचिव विश्वास ठाकूर यांनी सर्वप्रथम झूम अँपद्वारे १ एप्रिलला दुपारी चार वाजता शिक्षकांशी व्हिडिअाे कॉन्फरन्सवर संवाद साधला. मुख्याध्यापिका संगीता कासारे यांनी नलाइन मीटिंग घेत शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी, पालकांशी व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे सूचना देऊन आणि झूम अँपचा उपयोग करत विद्यार्थी कनेक्ट केले. यामुळे २ एप्रिलपासून विद्यार्थ्यांचा अभ्यास याेग्यप्रकारे शिकविला जात हे. दरराेज दाेन तास विद्यार्थी अाॅनलाइन शिक्षण घेत आहेत. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थीही घरी राहून अभ्यासापासून दूर जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली हाेती.

या उपक्रमामुळे विद्यार्थी अभ्यासात रममाण हाेत आहे. हा आगळावेगळा उपक्रम यशस्वी हाेण्यासाठी सुचिता कुलकर्णी, नीलांबरी क्षीरसागर, सीमा रुद्रवंशी, विलास जाेर्वेकर, संदीप गायकवाड, राहुल खंबाईत, मुक्ता पाठक, माधुरी कुलथे, याेगेश अाेहाेळ, दिलीप पवार, सुभाष भामरे परिश्रम घेत आहेत. पुढील वर्षी जोपर्यंत नवीन वर्षात शाळा सुरू हाेत नाही ताेपर्यंत दरराेज अाॅनलाइन शाळा सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका संगीता कासारे यांनी दिली.

सुटीच्या काळात अभ्यासाचा आनंद
सध्या सर्व विद्यार्थी घरीच असल्याने करमत नव्हते. पुढील वर्षी दहावीचा अभ्यासक्रम असल्याने थाेडेशी भीती हाेती. मात्र आतापासूनच अभ्यास सुरू झाल्याने खूप खूप आनंद झाला आहे. फक्त टीव्ही बघून व घरात बसून कंटाळा आला हाेता. आता छान वेळ जात आहे.
– फाल्गुनी रमाकांत कुलकर्णी, विद्यार्थिनी

विद्यार्थ्यांना फायदा हाेणारच
लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शिकण्याची चांगली संधी चालून आली आहे. आजपर्यंत नाशिकमधील काेणत्याही मराठी व सेमी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध झालेली नव्हती. झूम अँप खराेखरच फायदेशीर ठरत आहे.
– मुक्ता पाठक, शिक्षिका

- Advertisment -

ताज्या बातम्या