स्मार्ट रोडवर लवकरच ई-टॉयलेट्स; कामाला सुरवात
स्थानिक बातम्या

स्मार्ट रोडवर लवकरच ई-टॉयलेट्स; कामाला सुरवात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : स्मार्ट रॉड तयार झाला असून आता वाहतुक देखील सुरु असल्याची पाहायला मिळते. परंतु अजूनही अनेक कामे या स्मार्ट रोडवर व्हावयाची बाकी आहेत. यापैकीच एक म्हणजे ई-टॉयलेट्स. लवकरच स्मार्टरोडच्या फुटपाथवर ई-टॉयलेट बांधणार असून त्यासाठी स्मार्ट रोडचे पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे धिम्या गतीने सुरू असलेले काम केव्हा पूर्ण होईल, याच्या प्रतीक्षेत नागरिक असताना स्मार्ट रोडमध्ये असलेल्या ई-टॉयलेट उभारण्याचे काम सुरु होत असल्याने स्मार्ट रोडचे पुन्हा खोदकाम सुरू केले आहे. तर दुसरीकडे स्तंभावरील काम सुरु असल्याने गेल्या महिन्याभरापासून येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा १.१ किलोमीटरचा रस्ता हा स्मार्ट रोड म्हणून विकस‌ति केला जात आहे. स्मार्ट रोडचे काम झाले असले तरी अद्याप स्मार्ट रोडसाठी इतर सुविधा करण्यात येत आहे. यासाठी बराच वेळ खर्च होत असून नागरिकही याकडे आता फारसे लक्ष देताना दिसत नाहीत.

स्मार्टरोडच्या आराखड्यात वाय-फाय सुविधा, सायकल ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बेंचेस अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच स्मार्ट किऑस्क, ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध, स्मार्ट पोल, वाय-फाय सुविधा, सोलर पॅनल, रस्त्याच्या दुतर्फा एक मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक, दुतर्फा डक्ट तयार केले जाणार, तीनही चौकांत इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा हि कामेही येत्या काळात करण्यात येणार आहे. त्यामुळे अजून किती वेळ वाट पाहावी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com