नाशिकरोड : एक फूट लांब राहून तिकीट काढा; नाशिकरोड रेल्वेस्थानकावर नियम
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : एक फूट लांब राहून तिकीट काढा; नाशिकरोड रेल्वेस्थानकावर नियम

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दोन प्रवाशांमध्ये एक फुटावर लांब उभे राहून रेल्वे तिकिट काढण्यासाठी नियम करण्यात आला आहे. यासाठी आर पी एफ चे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल आहे. या नियमास रेल्वे प्रवाशांनी उस्फुर्त प्रतिसाद देत असून ठिकठिकाणी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांऐवजी तब्बल ५० रुपये करण्यात आलं आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे.

त्यानंतर शहरातील य यादों रेल्वे स्थानकांवर तिकीट विक्री दरम्यान लोकांची गर्दी होऊ नये ही काळजी घेत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली असून तिकीट काढतांना प्रवाशी या नियमाचा वापर करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचा उपाय रेल्वे प्रशासनाने केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com