देवळा : सावकी येथील डॉ. अमोल देवरेंचा वाढदिवस साजरा झाला कोविड कक्षात!
स्थानिक बातम्या

देवळा : सावकी येथील डॉ. अमोल देवरेंचा वाढदिवस साजरा झाला कोविड कक्षात!

Gokul Pawar

Gokul Pawar

खामखेडा : सध्या राज्यभर करोनाने थैमान घातले आहे. संकटकाळात आरोग्य सेवक , अधिकारी हे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. अशातच कुटुंबाला वेळही देता येत नाही. मग वाढदिवस कसा साजरा होणार…

पण सावकी ता.देवळा येथील रहिवाशी व सध्या मालेगाव येथील फरहान रुग्णालयात सेवा देत असलेले डॉ.अमोल देवरे यांनी आपला वाढदिवसाचा दिवसही कोविड कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सेवा देण्यात घालवला. आणि आपला वाढदिवसाचा आनंद या रुग्णासोबत व्यतीत केला.

देशात कोरोनाचे संकट ओढवले असताना देवदूताप्रमाणे जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या डॉक्टरांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. हे डॉक्टर कुटुंबापासून लांब राहून देशसेवेत स्वतःला वाहून नेत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आज ८ मे शुक्रवार रोजी डॉ. अमोल देवरेंचा वाढदिवस आहे. त्यांनी रुग्णालयातील कोविड कक्षातच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला  केक नव्हता आणि मित्र कुटुंबिय ही नव्हते. होते ते करोनाच्या सुटकेतून वाचण्यासाठी उपचार घेत असलेले रुग्ण व जीव मुठीत घेऊन काम करत असलेले डॉक्टर व नर्स.

रुग्णांच्या चेहऱ्यांवर असलेलं हसू माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट होतं. मला आशा आहे हे सर्व रुग्ण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकतील आणि हेच माझ्यासाठी खरं गिफ्ट असेल असे डॉ. अमोल देवरेनी म्हटलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com