Thursday, April 25, 2024
Homeक्रीडादेशातील ‘हे’ दहा अंपायर्स तुम्हाला माहिती आहेत का?

देशातील ‘हे’ दहा अंपायर्स तुम्हाला माहिती आहेत का?

नाशिक : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटसामने, टूर्ना मेंट्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना देखील क्रिकेट सामन्यांची आठवण येणे साहजिकच आहे. क्रिकेट सामन्यात अंपायर्स महत्वाची भूमिका बजावत असतात. मागील आपण जगातील दहा विशेष अंपायर्स यांचा माहिती घेतली. या भागात भारतातील काही अंपायर्सची माहिती घेणार आहोत.

भारतातील १० प्रमुख अंपायर्स

- Advertisement -

एस रवी
सुंदरम रवी म्हणून ओळख असलेले भारतीय क्रिकेट पंच आहेत. आयसीसी इलाईट पॅनलचे माजी सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत ४८ एकदिवसीय, २६ टी २० आणि ३३ कसोटी त्यांनी पंच म्हणून काम पहिले आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकमेव डे नाईट कसोटी सामन्याचा समावेश आहे. २०११ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये पदार्पण केले होते.

व्ही के रामस्वामी
व्हीरीचिरपुरम कृष्णमूर्ती रामस्वामी असे त्यांचे पूर्ण नाव असून त्यांचा जन्म मद्रासमध्ये झाला. सुरवातीला त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये काम केले. त्यानंतर क्रिकेटमध्ये आवड असल्याने भारतातील प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केले. १९७० पूर्वीच्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यांचा यात समावेश आहे.

वडोदरा येथे भारत विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यातून त्यांनी पदार्पण केले. त्यांनी १९८७-१९९६ वर्ल्डकप यात अंपायर म्हणून काम केले. तर १९८५ मध्ये कसोटी अंपायर म्हणून पदार्पण केले. तेव्हा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मद्रास येथे कसोटी सामना सुरु होता. १९८७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बंगलोर येथे झालेल्या कसोटी सामन्यात रामबाबू गुप्ता यांच्यासोबत ते सहअंपायर होते हा सुनील गावस्कर यांचा अखेरचा सामना होता.

ए साहेबा
रोल अंपायर म्हणून ओळख असलेले अमिश महेशभाई साहेबा यांनी प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये फलंदाज म्हणून गुजरात संघाचे प्रतिनिधित्व केले. २००० मध्ये त्यांनी अंपायर म्हणून आपला पहिला सामना खेळला. अहमदाबाद विश्वचषकाच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात पंच म्हणून २० षटकांच्या सामन्यात अंपायर म्हणून काम केले. प्रथम श्रेणी सामने ११३ टी २० सामने.

शमसुद्दीन
चेत्तीथोडी शमसुद्दीन हे आयसीसी अंपायर्सच्या इमिरेट्स आंतरराष्ट्रीय पॅनलचे सदस्य आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ३९ एकदिवसीय सामने तर २१ टी२० सामने खेळले आहेत. तत्पूर्वी ते फलंदाज म्हणून खेळत होते. आयपीएल चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेतुन त्यांनी आपल्या अंपायर कारकिर्दीला सुरवात केली. दरम्यान आयसीसीच्या इंटरनॅशनल पॅनलसाठी त्यांचे नाव सुचवण्यात आले आहे.

जयप्रकाश
अरानी वेलपुधाम जयप्रकाश हे भारताचे माजी फलंदाज तसेच त्यानंतर कसोटी अंपायर म्हणून काम पहिले. त्यांनी एकूण ७९ सामने खेळले. १९८४-८५ मध्ये त्यांनी कर्नाटकसाठी ६ अंतिम सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. १२५ डावांमध्ये ३५. ४९ च्या सरासरीने ३७२७ धावा केल्या. यात ६ शतके २१ अर्धशतकांचा समावेश आहे.

गोलंदाज म्हणूनही त्यांची कामगिरी चांगली असून या १२५ डावांत ६० विकेट्स काढल्या आहेत. आंध्रविरुद्धच्या सामन्यात ३ विकेट १२ धावा ही त्यांची सर्वाधिक कामगिरी आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात १५० धावा आणि २ विकेट्स आणि ३८ रन्स अशी अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली. १९९७-२००० मध्ये त्यांनी १३ कसोटी सामन्यात पंच म्हणून काम केले. कसोटी अंपायर म्हणून त्यांनी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांमधून केले. त्यांनी ३८ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम केले आहे.

हरिहरन
कृष्णा हरिहरन यांनी १९९७-२००६ मध्ये ३४ कसोटी सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम केले आहे. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातून त्यांनी अंपायर म्हणून पदार्पण केले. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.

एस के बन्सल
श्यामकुमार बन्सल हे भारताचे माजी कसोटी आणि एकदिवसीय अंपायर म्हणून ओळख आहे. त्यांनी ६ कसोटी ३० वनडे कसोटी सामने खेळले आहेत. भारत विरुद्ध झिम्बाब्वे कसोटी सामन्यातून पदार्पण केले आहे.

अनिल चौधरी
अनिल चौधरी यांनी अंपायर म्हणून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात काम पाहिले. तर भारत विरुद्ध विंडीज टी २० सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. पंच म्हणून एकदिवसीय सामने २०, टी २० सामने २७, २०१८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली होती याशिवाय १९-२० वर्षाखालील विश्वचषकात अंपायर म्हणून निवडण्यात आले होते.

सी के नंदन
सी के नंदन यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९६३ ला झाला. रणजी करंडकमधून पंच म्हणून पदार्पण केले. १९९९-२००० या हंगामात त्यांनी २ सामन्यात पंच म्हणून काम केले. हे सामने हरियाणा विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात झाले. २००३ मध्ये त्यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ते पंच म्हणून होते. हा त्यांचा पहिला सामना होता. २०१४ मध्ये बांगलादेश मध्ये आशिया चषकात ते ४ सामन्यांकरता थर्ड अंपायर होते. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात ते अंपायर होते. २०१३ आयपीएल स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून पदार्पण केले.

विनीत कुलकर्णी
विनीत अनिल कुलकर्णी यांनी रोल अंपायर म्हणून काम पाहिले. त्यांनी २५ एकदिवसीय सामने आणि १४ टी२० सामन्यात काम पाहिले. कुलकर्णी यांनी लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी सामन्यांमधून २००९ मध्ये पदार्पण केले. विनीत कुलकर्णी यांचे वडील वकील आहेत. ते आयसीसीच्या इंटरनॅशनल पॅनलचे सदस्य आहेत.

नितीन मेनन
नितीन नरेंद्र मेनन हे उजव्या हाताचे फलंदाज असून सध्या पंच म्हणून काम पाहतात. त्यांनी भारत विरुद्ध इंग्लंड या टी२० या सामन्यातुन पदार्पण केले आहे.

-सलील परांजपे, देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या