कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करू नका; एसटी महामंडळाच्या सूचना

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । कोणत्याही परिस्थितीत एसटी सेवकांंची साप्ताहिक सुट्टी रद्द करू नये, कारण त्या दिवसाचा पगार दुप्पट दराने द्यावा लागतो, अशा सूचना महामंडळाने राज्यातील विविध विभागातील महाव्यवस्थापकांसह विभाग नियंत्रकांना केल्या आहेत.

तोट्यातून बाहेर पडण्यासाठी खर्चात कपात करण्याचा निर्णय एसटीने घेतला असून महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असून ती सुधारण्यासाठी, खर्चात कपात व उत्पन्नवाढीसाठी एक आढावा बैठक एसटीचे व्यवस्थापकीय संचालक घेणार आहेत. 23 डिसेंबर रोजी पुणे येथे ही बैठक होणार असल्याचे समजते. महामंडळाने नव्याने केलेल्या सूचनांनुसार आगारनिहाय कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली आहे.

महामंडळाला 2018-19 मध्ये 4 हजार 549 कोटी रुपये संचित तोटा झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठीही बसगाड्या व आगारांची दुरवस्था इत्यादी कारणीभूत ठरत आहे. उत्पन्न कमी झाल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील वेतनही कमी झाले. यानंतर आता एसटी महामंडळाने खर्च कपात करण्यासाठी आटापिटा सुरू करून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

  • या आहेत सूचना
  • सध्या महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अत्यावश्यक असतील तेवढीच इमारत दुरुस्त व देखभालीची कामे करून घेण्यात यावी.
  • इतर कामे महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच करण्यात यावी.
  • उत्पन्न वाढीसाठी प्रवासी वाढवा मोहीम जोमाने राबवावी.
    *
  • चालक व वाहक गैरहजेरीप्रमाणे तपासा.
  • रिकाम्या व्यापारी जागांचा वापर इतर कारणांसाठी करण्यासाठी तपासून बघणे.
  • 18 टक्के भाडेवाढ बिनकामी
  • उपाययोजना सुचवताना काढलेल्या आदेशात जून 2018 मध्ये 18 टक्के भाडेवाढ करूनदेखील उत्पन्नात वाढ झालेली नसल्याचे म्हंटले आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 या कालावधीची कामगार वेतनवाढ अंमलात आणल्याने महामंडळावर पगारवाढीचा मोठा आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळेच वाढलेला भार कमी करण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी खर्चात काटकसर करावी, अशी सूचना केली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *