Friday, April 26, 2024
Homeनाशिकननाशी : तहसिल कार्यालयाच्या आवारातच लाच घेतांना मंडल अधिकारी अटकेत

ननाशी : तहसिल कार्यालयाच्या आवारातच लाच घेतांना मंडल अधिकारी अटकेत

ननाशी । दिंडोरी तालूक्याच्या पश्‍चिम भागात गेल्या अनेक वर्षांपासुन आपले साम्राज्य उभे करणारे ननाशीचा  मंडल अधिकारी वसंत खोटरे आज अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला असुन त्याला 2000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.याबाबत सामान्य आदिवासी नागरिकांनी सुदधा आनंद व्यक्‍त केला आहे.

ननाशी भागात गेल्या अनेक वर्षांपासुन खोटरे हा तलाठी म्हणुन कार्यरत आहे.पश्‍चिम आदिवासी भागातील आदिवासीच्या जमिनीचे मोजमाप नसल्याने व आदिवासी बांधवही अज्ञान असल्याने त्याचा फायदा अनेक उच्चभ्रु लोकांनी उचलला. त्यामुळे आदिवासी बांधवांना खुप त्रासही झाला.नविन पिढीला जमिनीबाबत कायदेशीर कळु लागल्याने उतार्‍यांमध्ये झालेले बदल त्यांना कळले. परंतु कायदेशीर बाबीत आदिवासी बांधव कमी पडले. त्यांना तलाठी कार्यालयाकडुन अजिबात सहकार्य मिळत नव्हते. गौण खनिज अवैध वाहतुकीतही चारोसेपासुन अनेक घोटाळे झाले.

- Advertisement -

महसुल विभांगाला गौण खनिजप्रकरणी तोटाच सहन करावा लागला.अनेक गावात अवैध उत्खनन दिसुन आले होते. याप्रकरणी कधीही खोटरे याने माहिती होऊ दिली नाही.चारोसे रस्त्यावरील डोंगरही उत्खनन झाला होता.ननाशी येथील नविन शर्तीचे जमिनीचे एका गरीब तक्रारदाराला पुर्तता करायची होती. त्यासाठी खोटरे यानेतक्रारदाराकडुन दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने अखेरीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखालीअतिरिक्‍त पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, पो.नि.पालकर, निकम, कर्मचारी पी.एन.कराड, महाजन, देशमुख यांनी दिंडोरी तहसिलदार कार्यालयाच्या मागच्या बोळीत वसंत खोटरे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली. दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या