गंगापूर बोट क्लबसाठी एक कोटीची तरतूद; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक
स्थानिक बातम्या

गंगापूर बोट क्लबसाठी एक कोटीची तरतूद; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक

Gokul Pawar

नाशिक : यंदाच्या जिल्हा नियोजनात ७५ कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यासाठी ३४६ कोटी मंजूर केले होते. परंतु यावर्षी ३४९ कोटी देण्याचा प्रस्ताव होता, मात्र या बैठकीत ४२५ कोटी मंजूर केले असून लवकरच कामांना सुरवात करणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन आढावा बैठीकीत दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी विविध विभागातर्फे करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, इतर विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, सर्व विभागाने योग्य समन्वय साधून जिल्ह्याला मिळालेला संपुर्ण निधी खर्च होईल असे नियोजन करावे. आरोग्य, शिक्षण, बांधकाम, विद्युत सुविधांची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करावीत. काही वर्षांपासून रखडलेले गंगापूर बोट क्लब दुरूस्ती साठी एक कोटी, तर शहरातील क्रीडा कॉम्प्लेक्स, संकुल यांच्याकसाठी दीडशे वर्षाकरिता निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच इगतपुरी हिल स्टेशन करीता विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी महाबळेश्वरच्या धर्तीवर हिल स्टेशन उभारण्यात येईल.

ते पुढे म्हणाले कि, या आराखड्यात वाढीव निधी मंजूर केला असून या वाढीव पैशातून शहर आणी ग्रामीण विकास साधण्यात यावा. तसेच शाळा आणि अंगणवाडी करीता वाढीव निधी आहे. त्यामुळे निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी आणि कामे वेगाने करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Deshdoot
www.deshdoot.com